लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
२ वाट्या बासमती तांदुळ
२ मध्यम साईझच्या झुकिनी
५-६ लसणाच्या पाकळ्या सोलुन, बारीक तुकडे करुन
२-३ हि.मिरच्या
मीठ, हळद
४-५ वाट्या व्हेजी स्टॉक किंवा पाणी
२ मध्यम साईझच्या झुकिनी
५-६ लसणाच्या पाकळ्या सोलुन, बारीक तुकडे करुन
२-३ हि.मिरच्या
मीठ, हळद
४-५ वाट्या व्हेजी स्टॉक किंवा पाणी
क्रमवार पाककृती:
तांदुळ धुऊन त्यात खिसलेली झुकिनी १५-२० मि. मिसळुन
ठेवावी. एका भांड्यांत तेल तापऊन लसुण टाकावा. लसुण ब्राऊन झाल्यावर
त्यावर हळद आणि तांदुळ चांगले परतुन घ्यावे. मीठ घालुन मिक्स करावे. २-३
वाट्या व्हेजी स्टॉक घालुन मंद गॅसवर भांडे झाकुन, तांदुळ शिजत ठेवावे. एका
वेळी खुप स्टॉक न घालता थोडा थोडा घालावा. हा भात जरा कमी शिजलेला छान
लागतो आणि बुडाला लागलेला मस्त. शिजल्यावर ५-१० मि वाफ मुरल्यावर, गरम गरम
तुप घालुन पापडा सोबत खावा.
वाढणी/प्रमाण:
४ जणं
अधिक टिपा:
झुकिनी एवजी दुधी पण छान लागतो. मिरची एवजी लाल तिखट पण मस्तच लागतं.
माहितीचा स्रोत:
आईच्या भोपळ्याच्या भातवरुन सुचलेले





