लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पनीर
कांदा
लाल, हिरवी, पिवळी सिम्ला मिरची
अननस
मॅरीनेशन -
तेल, दही, चिकन टिक्का मसाला, धने पुड, जीरे पुड, आमचुर पावडर, पुदिन्याची चटणी, मीठ, तिखट, खायचा रंग
कांदा
लाल, हिरवी, पिवळी सिम्ला मिरची
अननस
मॅरीनेशन -
तेल, दही, चिकन टिक्का मसाला, धने पुड, जीरे पुड, आमचुर पावडर, पुदिन्याची चटणी, मीठ, तिखट, खायचा रंग
क्रमवार पाककृती:
सगळ्या मिरच्या, पनीर, कांदा अननस चौकोनी आकारात कापुन घ्यावेत.दही चहा गाळायच्या किंवा तळणीच्या गाळणीत ठेवुन पाणी काढुन घ्यावे, घट्ट दही हे आवश्यक आहे.
मॅरीनेशनचे सगळे जिन्नस एकत्र करुन २-३ तास भाज्या/पनीरला (अननस सोडुन)
लाऊन ठेवावे. काड्यांना लाउन कुलिंग रॅकवर मांडुन बेकिंग ट्रेवर ३५० फॅ वर
४०-४५ मि ठेवावे.
सर्व्ह करताना ५ मि. ब्रॉईलवर ठेवावे. देताना चाट मसाला भुरभुरुन द्यावा, पाहिजे असल्यास लिंबु वरुन. पुदिना चटणी पण सोबत द्यावी.




No comments:
Post a Comment