Friday, September 26, 2014

झुकिनी राईस

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
२ वाट्या बासमती तांदुळ
२ मध्यम साईझच्या झुकिनी
५-६ लसणाच्या पाकळ्या सोलुन, बारीक तुकडे करुन
२-३ हि.मिरच्या
मीठ, हळद
४-५ वाट्या व्हेजी स्टॉक किंवा पाणी
क्रमवार पाककृती: 
तांदुळ धुऊन त्यात खिसलेली झुकिनी १५-२० मि. मिसळुन ठेवावी. एका भांड्यांत तेल तापऊन लसुण टाकावा. लसुण ब्राऊन झाल्यावर त्यावर हळद आणि तांदुळ चांगले परतुन घ्यावे. मीठ घालुन मिक्स करावे. २-३ वाट्या व्हेजी स्टॉक घालुन मंद गॅसवर भांडे झाकुन, तांदुळ शिजत ठेवावे. एका वेळी खुप स्टॉक न घालता थोडा थोडा घालावा. हा भात जरा कमी शिजलेला छान लागतो आणि बुडाला लागलेला मस्त. शिजल्यावर ५-१० मि वाफ मुरल्यावर, गरम गरम तुप घालुन पापडा सोबत खावा.

वाढणी/प्रमाण: 
४ जणं
अधिक टिपा: 
झुकिनी एवजी दुधी पण छान लागतो. मिरची एवजी लाल तिखट पण मस्तच लागतं.
माहितीचा स्रोत: 
आईच्या भोपळ्याच्या भातवरुन सुचलेले

No comments:

Post a Comment